साबूदाण्याची ताकातली खीर

  • २ वाट्या ताक
  • १/४ ते १/२ वाटी भिजलेला साबूदाणा
  • ३ चमचे दाण्याचे कूट
  • १/४ चमचा बारीक केलेली हिरवी मिरची
  • चवीप्रमाणे मीठ (१/४ चमचा मीठ लागेल असा अंदाज)
  • १/४ चमचा साजूक तूप
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
२० मिनिटे
२ वाट्या

पातेल्यात तूप गरम करावे. मग त्यात जिरे घाला. हिरवी मिरची घाला.  मग साबूदाणा, कूट, मीठ घालून थोडेसे परतावे. आता त्यात ताक घालावे. खीर छान उकळेल व साबूदाणा पारदर्शक होईल. झाली ताकातली तिखट खीर तयार. आता त्यात कोथिंबीर घालून नीट ढवळा आणि खायला द्या.

हिरवी मिरची बारीक न करता आख्खी उभी चीर देऊन घातली तरी चालेल.

साबूदाणा भिजवण्याचे अनुभव कथन येथे   केले आहे. दोस्त मंडळींनी अजून काही तिखट खिरीचे प्रकार तेथे सांगितले आहेत.

माझ्या सौ. आई.