व्हेज ६५

  • फ्लॉवर, कॉर्न फ्लोअर
  • शेजवान सॉस
  • तिखट, मिठ
  • बेसन, तळणीसाठी तेल
  • पाणी
३० मिनिटे

सर्वात आधी फ्लॉवर ची फुले लांब दांड्यासकट काढून साफ करुन घ्यावीत. त्यानंतर थोड्या मिठाच्या पाण्यात ही फुले टाकून फ्लॉवर अर्धवट शिजवून घ्यावा (फक्त ५/१० मिनिटे उकळून घेणे).

कॉर्न फ्लोअर (२ चमचे), तिखट, मिठ (चवीनुसार), शेजवान सॉस (हा सॉस कूक करून खायचा असतो असाच बाजारात मिळतो.) आणि थोडे बेसन (२/३ मोठे चमचे) व पाणी घालून सगळे नीट मिक्स करून घ्यावे. (मिश्रण जास्ती सैल होता कामा नये). त्याच्यात फ्लॉवरची अर्धी शिजवून घेतलेली फुले घालून नीट घोळून घ्यावे (हे मिश्रण फ्लॉवर च्या फुलावर नीट बसायला हवे. जर फ्लॉवर चे फुल फक्त लाल दिसत असेल तर मिश्रण आणखी थोडे दाट पाहिजे.) आणि कडकडीत गरम तेलात तळून घ्यावेत.

तळताना मिश्रण तेलात पसरत असेल तर मिश्रणात आणखी थोडे डाळीचे पिठ घालावे.

घरी पार्टी असेल तर स्टार्टर म्हणून हा उत्तम पर्याय आहे.

पहिल्याच प्रयत्नात जमेलच असे नाही. पण थोडया सरावाने छान जमायला लागते.

स्वानुभव