रिटर्न ऑफ मुद्राराक्षस...!!!

माझ्या यापूर्वीच्या अशा प्रकारच्या विनोदांना सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने पुन्हा एकदा हा मुद्राराक्षस परतलाय, माझ्या मनातून मनोगतवर....

रिटर्न ऑफ मुद्राराक्षस...!!!  

* दगडी चाळीत नवरा उत्सव सुरू ( नवरात्रोत्सव )

* पुण्यात पडली धडाक्याची थंडी ( कडाक्याची )

* खिशात मोबाईल ठेवून बोलणे पातक! ( घातक )

* हिमाचल प्रदेशात बस दरीत मिसळली ( कोसळली )

* फिल्मफेअर आवड समिती ची यादी जाहिर झाली. ( निवड )

* सहा दोषींना काशीची रिक्षा ( फाशीची शिक्षा )

* वाहनतळ परिसरात जुगार अड्डे सोकावले ( फोफावले )

* मोदी म्हणतात आता कॉफी मागा! ( माफी )

* मुंबईचा युवक ऑस्ट्रेलियात घार झाला ( ठार )