'संगणक आज्ञावली' मराठीतून शक्य आहे का?

मी एक नुकतेच संकेतस्थळ पाहिले त्यात  हिंदवी प्रोग्रॅमिंग सिस्टम या सॉफ्टवेयरचा वापर करता येवून त्या आज्ञावलीच्या वापराने मराठी/ हिंदीतून आज्ञावली लिहिता/रचता येते असे लिहीले आहे. मला तरी हे अशक्य वाटतं. कारण अश्या आज्ञावलीने एखादा 'थातूर-मातूर' प्रोग्रॅमच लिहिता येईल. कारण व्याकरण व लिपीतील 'क्शरचिन्हांचा' (व्यंजन चिन्हांचा) व 'स्वरचिन्हांचा' आप-आपसातील संबंध प्रस्थापित केल्याशिवाय मराठीतून प्रोग्रॅम लिहिताच येणार नाही.

ज्यांना प्रॉग्रॅमींग मधलं कळतं अशी मंडळी या माहितीवर प्रकाश टाकू शकतील का?