मेयॉनीज़

  • २ अंड्यांचा पिवळा बलक,
  • दीड कप तेल
  • ४ चमचे लिंबाचा रस
  • चवीला मीठ
१५ मिनिटे
२५० ग्रॅम

२ अंड्यांचा पिवळा बलक काढून एकामोठ्या रुंद तोंडाच्या भांड्यात घ्या.  त्यात मीठ घालून ते ढवळायला लागा.  फार वेगाने न ढवळता पण व्यवस्थित जोराने (शक्यतो काट्याने) ढवळा.  नंतर अर्धा चमचा रस घाला.  त्यात थोडे थोडे तेलाचे थंब-थेंब घालत ढवळत रहा.

लिंबाच्या रसाने अंडे पातल होते तर तेलाने ते घट्ट होते.  जास्त घट्ट झाले कि अर्धा चमचा लिंबाचा रस घाला.  एकदा चान्गले मिश्रण होऊ लागले की तेल आणि रस आळीपाळीने घालून हे मेयॉनीज़ पुरे करा. 

शीतकपाटांत आठवडाभर सहज चांगले.  जास्त तयार झाले तर जास्त लोकांना तुमच्या पाकक्रिया खालायला घाला.  बजारात तयार मेयो मध्येटिकण्याचे घटक असल्यामुळे बरेच दिवस ते शीतकपाटात राहू शकते.  घरी केलेले चवीलाजास्त चांगले लागते.

नाहीत.

चांगले झाल्यास मीच