वो शाम कुछ अजीब थी...

संध्याकाळी ८. ३० ची वेळ होती. मी असाच ऑफिस मध्ये कामाच्या गडबडित होतो. तसा इतक्यात नेहमीच ऑफिस मढ़ना घरी जायला उशीर व्हयाचा. काम भरपूर होत. ती दिवसभर माझ्या सोबतच असायची. आम्ही दोघ एकाच मॉड्यूल वर आणि एकाच कंप्यूटर वर काम करायचो. तिच लग्न नुकताच झाला होत हे मला माहीत होत पण तरीही एक अनामिक ओढ़ आमच्यात होती. ती नेहमी म्हणायची की " मी तिला जरा उशीरा भेटलो"
मी कामात गुंग असतांना ती माझ्यासाठी काफी आणायची. आम्ही रात्री बर्याच वेळ पर्यंत गप्पा मारायाचो. नंतर मी तिला रात्री तिच्या घरी ड्राप करायचो.

तीन चार महीने कसे गेलेत कळलच नाही. दिवस असेच धुंदीत चालले होते. भविष्याचा जराही विचार न करता आमचा आयुष्याचा प्रवास चालला होता. आम्हाला एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटायचा. ऑफिस च्या सगळ्याच पार्टयाँ मध्ये ती माझ्याच सोबत असायची. मी सुट्टी वर असलो तर ती अस्वस्थ व्हायची आणि ती सुट्टीवर असेल तर मी अस्वस्थ व्हायचो.

काळ हां फार फसवा असतो. जेव्हा काही चांगला होत असेल तेव्हा लगेच निघून जातो अणी जेव्हा काही वाईट होत असेल तेव्हा एकेक क्षण खुप लांब वाटतो. आमच ही काही असच झाल. एका दिवशी सकाळी तिनी मला सांगितल की तिला तिच्या नव्र्यसोबत हैदराबाद ला शिफ्ट व्हाव लागणार आहे. त्या दिवशी आम्ही दोघही सुन्न झालो होतो. माझा तर काळीज हदारायला लागला होत. माणुस नकळत पणे कोणाच्या तरी प्रेमात पडतो आणि नंतर सगळ गमावून बसतो. नियती माणसाला प्रेमात गाफिल करून आपला डाव साधते. मला सारखा प्रश्न पडतो जर एखाद्याला एखादी मुलगी भेटनाराच नसेल तर देव त्या दोघांना प्रेमात तरी का पाडतो?? की कदाचित देवाला विरहाच्या वेदनाच कळत नाहीत??

आज तिला जाऊंन बरोबर एक महिना झाला पण आजही ती मला तीतकीच जवळ जाणवते. त्या मॉड्यूल वर काही काम आल की अगोदर तिची आठवण येते. तिच्या आठवनिनी डोळे भरून येतात. सुरवातीला आमचे खुप मेंलस चालाय्चेत. हळउ हळउ ती तिच्या कामात बीझी झाली अणी मी माझ्या कामात, पण आमच्या लव स्टोरी चा जो अंत झाला तो इतर कोणाचा ही हूँ नए असा मनापासून वाटत. आता ती पण या जगाच्या गर्दित कुठे तरी हरवून जाईल  आणि मी पण स्वताहाला कुठ तरी हरवून टाकील. पण आमच्या या छोट्याश्या लव स्टोरी च काय ??? की ती पण स्वताहाला काळाच्या  पानामध्ये कुठे तरी हरवून बसेल??

आजही ऑफिस मध्ये ८. ३० वाजत आहेत. तिच नुकताच फ़ोन येऊन गेला. आजची तिच्या आवाजात तोच आपलेपणा, तीच ओढ़, तेच प्रेम जाणवत.. म्हणुनच कदाचित मला या वेळी राजेश खन्ना च ते गाना आठवत आहे " वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब हैं, वो कल भी पास पास थी वो आज भी करीब हैं".