ऑक्टोबर
१६
२००८
जिन्नस
- गव्हाचे पीठ-१ वाटी
- तांदळाचे पीठ-१/२ वाटी
- मक्याचे पीठ-१/२ वाटी
- कोबी, गाजर, काकडी यांचा खीस-
- फरस बी बारीक चिरून
- कोथिंबीर
- जिरेपूड-१चमचा
- लाल तिखट
- मीठ
- हिंग
मार्गदर्शन
सर्व पीठे भाज्या एकत्र कराव्या.
त्यामध्ये मीठ, लाल तिखट, हिंग, जिरेपूड, कोथिंबीर घालून एकत्र करावे.
मग त्यात पाणी घालावे. दोश्याच्या पीठाइतपत घट्ट असावे.
मग त्याची धिरडी घालावीत. थोडेसे तेल सोडून दोन्हीबाजूंनी खमंग होऊ द्यावीत.
मुलांना द्यायची असतील तर त्यावर बटर घालू शकता किंवा श्रेडेड चीज घालावे.
टीपा
मुलांसाठी उत्तम. सर्व पीठे भाज्या मुलांनी खाल्ल्याने समस्त आई मंडळी खूश......झटपट तय्यार.
माहितीचा स्रोत
स्वप्रयोग
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
वा!
प्रे. रोहिणी (शुक्र., १७/१०/२००८ - ००:००).
मस्तच!
प्रे. सोंगाड्या (शुक्र., १७/१०/२००८ - ०५:५१).