ऑक्टोबर
१७
२००८
जिन्नस
- लाल भोपळा एक लहान तुकडा
- ४ चमचे साखर
- दिड कप गरम दुध
- चारोळी २ चमचे, खिसलेले बदाम १ चमचा
- २ चिमटी वेलदोडा पुड
- २ चिमटी मीठ
मार्गदर्शन
भोपळा कुकरमध्ये थोडे पाणी घालून शिजवून घ्यावा. शिजलेला भोपळा ब्लेंडरने बारीक करून साखर घालावी आणि एका भांड्यात शिजविण्यास ठेवावे. रटरट उकळू लागल्यावर दुध घालून गॅस लो वर करून ठेवावा. १/२ तास साधारण उकळू द्यावे. बासुंदी सारखी झाली पाहिजे. थोडी कोमी झाल्यावर मीठ, चारोळी, बदाम आणि वेलदोडा पुड टाकावे.
टीपा
ह्या खिरीत फक्त चारोळी, बदाम टाकावे, बाकीचे ड्राय फ्रुटस चांगले लागत नाहीत. मीठ जरुर टाकावे. दुधाचे प्रमाण कमी जास्त करावे, जेणे करून दुध टाकल्यावर केशरी रंग दिसला पाहिजे, तरच भोपळ्याची चव येते. साखर पण कमी जास्त आवडीप्रमाणे करावी. मी प्रमाण अंदाजे दिले आहे.
माहितीचा स्रोत
सासुबाई
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
छान दिसतेय .......
प्रे. सस्मित (रवि., १९/१०/२००८ - ०७:४३).
धन्यवाद
प्रे. रामची आई (सोम., २०/१०/२००८ - १८:०२).