ऑक्टोबर १८ २००८

शुद्धलेखनाची नवी क्षितीजे

शुद्धलेखनाची नवी क्षितीजे
मानवाला ध्वनी आणि त्याचा अर्थ यांची सांगड घालता येते. मानव-निर्मित ध्वनी-संकेतांची ओळख करून घेता येणे म्हणजे भाषा शिकणे होय. निसर्गाने मानवी-भाषा निर्माण करणे, शिकणे, वापरणे, साठविणे याबाबतची केंद्रे मानवाला दिलेली आहेत पण भाषा दिलेली नाही. उदाहरणः मानवाच्या ८००० हून अधिक भाषा आजमितीस अस्तित्वात आहेत.
'ऐकणे-उच्चारणे-ऐकणे' या ध्वनीच्या वर्तूळाकार प्रवासाला आपण मौखिक-भाषा म्हणतो. प्रत्येक मानवाची भाषेची जाण प्रथम मौखिकपणातून साकारते कारण केवळ त्याच मार्गाने मेंदूतील विविध ध्वनी-केंद्रात आपण भाषा प्रस्थापीत करू शकतो. भाषेच्या लिखितपणाची ओळख होण्याआधी प्रत्येक मानवाला भाषेच्या मौखिकपणाची ओळख होते. उदाहरणः आईने केलेला उच्चार ऐकून लहानपणी आपण तसा उच्चार करायचा प्रयत्न करतो. आपण केलेला उच्चार आईने केलेल्या उच्चारासारखा जमेपर्यंत आपण प्रयत्न करत राहतो. ऐकणे-उच्चारणे-पुन्हा ऐकणे या वर्तूळाकार प्रवासातून मानवाला भाषाऱ्येऊ लागते. मानवाच्या मेंदूतील केंद्रांतून ध्वनीची ओळख-अर्थ-संग्रह हे महत्वाचे तीन भाग सांभाळले जातात आणि त्यांचे ग्रहण-प्रक्षेपणही मानवाला शक्य असते.
ज्या मानवांना ऐकू येत नाही त्यांच्याबाबतीत 'ऐकणे-उच्चारणे-ऐकणे' हा वर्तूळाकार प्रवास पूर्ण न झाल्याने मेंदूतील ध्वनी-केंद्रात भाषा प्रस्थापीत होऊ शकत नाही. उच्चार करण्यासाठी मुखातील अवयवांना द्यायच्या आज्ञा मेंदूतील ध्वनी-केंद्रात स्थापन करणे शक्य न झाल्याने बहीऱ्या मानवांना नीट बोलताही येत नाही. ज्या उर्जेचा 'ग्रहण आणि प्रक्षेपण' असा प्रवास मानवाला शक्य होतो त्याचाच वापर करून मानव, भाषा ही संकल्पना राबवू शकतो.
'बघणे-लिहीणे-बघणे' या प्रकाशाच्या वर्तूळाकार प्रवासाला आपण लिखित-भाषा म्हणतो. मानवाच्या मेंदूतील केंद्रांतून प्रकाशाची ओळख-अर्थ-संग्रह हे तीन महत्वाचे भाग सांभाळले जातात. त्यांचे डोळ्यातून ग्रहण आणि कागदावरून चित्र-चिन्ह-रूपाने प्रक्षेपण करणे मानवाला शक्य असते. १) 'मौखिक-संस्कार', २) 'बघणे-लिहीणे-बघणे यांची व्याप्ती-परंपरा', आणि ३) 'भाषेची-कागदी-वृत्ती' या तीन गोष्टींवर कागदाच्या माध्यमातून भाषा किती-कितपत-कशी साकारणे शक्य असते हे कळते.
१) 'मौखिक-संस्कार' उदाहरणः मराठी आणि संस्कृत दोन्ही भाषा देवनागरी लिपीत लिहील्या जातात. संस्कृत भाषा संवृत्त आणि विवृत्त दोन्ही अक्षर रचनेवर तर मराठी भाषा केवळ विवृत्त अक्षर रचनेवर आधारलेली आहे. त्यामुळे संस्कृत भाषेत शब्द-संधी होतात पण मराठीत शब्द-संधी होत नाहीत. इंग्रजीला त, गुजरतीला अं, बंगालीला व, जपानीला ट उच्चारता येत नाहीत.
२) 'बघणे-लिहीणे-बघणे यांची व्याप्ती-परंपरा' उदाहरणः जुन्या मराठीतला हा हिंदीपेक्षा वेगळ्या वळणाचा होता. हा ल असा लिहीला तरी कोणीही तो त, प, ज्ञ,... वगैरे समजण्याची सुतराम शक्यता नसतानाही तो योग्य मानावा का हा प्रश्न उपस्थित झालेला सर्वपरिचीत आहे. उभी रेष देऊन पूर्णविराम देण्याची हिंदीची पद्धतीत बदलली जाऊन त्याजागी टिंब आले आहे. भाषा ओघवती असते आणि भाषा हळूहळू जागतीकीकरणात सामिल होतात याची ही चुणूक मानता येते. संस्कृत मधील ब्राह्मण शब्द मराठीत ब्राम्हण असाच बोलला आणि लिहिला जातो.
३) 'भाषेची-कागदी-वृत्ती' उदाहरणः 'उच्चाराच्या कालमापनाचा' लिखित अक्षरावर परिणाम होत नाही. रंप म्युझिक मधील जलद गतीतले शब्द आणि माननीय वाजपेयींच्या भाषणातील संथ गतीतील शब्द यांच्यासाठी वापरलेली अक्षरे एकाच लांबी-रूंदीची असतात! मौखिक उच्चारतील Frequency आणि Loudness लिखित अक्षरांच्या वळणातून दाखविता येत नाहीत. शब्दाचा अर्थ आणि शब्दाचा उच्चार यांची व्याप्ती शब्द-कोषातून केवळ लिखितपणापूरतीच मर्यादित असते कारण त्यात Frequency आणि Loudness यांना थारा नसतो. त्यासाठी 'तो उच्च स्वरात म्हणाला' किंवा 'तो जोरात ठसक्यात बोलला' अशी लिखित विषेशणे वापरावी लागतात. शब्द-कोषांची व्याप्ती जणू लिखित शब्दां पुरतीच मर्यादीत राहते. वाट या शब्दानंतर 'दाखविली' ऐवजी 'लागली' लिहीले तर विरोधी अर्थ सामोरा येतो! गद्य आणि पद्य लिहिण्याची ठराविक रीत कागदावर पाळावी लागते. विराम-चिन्हांची व्याप्ती ही केवळ कागदापूरतीच मर्यादीत राहते. उच्चारात अक्षरांतील आणि शब्दांमधील विराम कसेही घेतले गेले तरी कागदावरती ते समान दर्शविले जातात.
आता संगणकातूनही 'बघणे-लिहीणे-बघणे यांची व्याप्ती-परंपरा' हे सोपस्कार पाळले जातात. त्यामुळे वरील तीन गोष्टीं व्यतिरीक्त 'भाषेची-संगणकीय-वृत्ती' याचाही समावेश मानवाला शुद्ध-लेखनात करावा लागणार आहे.
त्यामुळेच 'शुद्ध-लेखनाचा' विचारही १) 'मौखिक-संस्कार', २) 'बघणे-लिहीणे-बघणे यांची व्याप्ती-परंपरा', ३) 'भाषेची-कागदी-वृत्ती', आणि ४) 'भाषेची-संगणकीय-वृत्ती' या चार गोष्टीतून मार्गस्थ व्हायला हवा.
कागदी-वृत्तीपेक्षा संगणकीय-वृत्तीला भाषांच्या मौखिकपणातील बरेच अधिक गुण जपता सावरता येतात. भाषांची 'संगणकीय-वृत्ती' या विभागात पुढील महत्वाचे भाग येतात. १) भाषांची Key board वरती केलेली आखणी, २) Window रचनांसाठी निर्माण केलेल्या True Type Fonts आणि Open Type Fonts या टाईपींगच्या संकल्पना, ३) Unicode ही सर्व भाषांची चित्र-चिन्हे पुरविणारी नाविन्यपूर्ण सोय, ४) 'लिखित-बडबड' ही सर्व भाषांना इंटरनेटमधून लागू होणारी व्याधी! ५) 'Standadization of typing in Windows and in Unicode' असा सर्व भाषांना आधूनिक युगात लागू होणारा परिणाम.
१) Key board उदाहरणः इंग्रजी भाषेसाठी बनविलेले Key board मराठीसाठी किंवा इतर भाषांसाठी वापरताना phonetic-key-board या उक्तीची विविध रूपे सामोरी येतात! मराठीतील ग ची जर g वर आणि घ ची जर G वर नेमणूक केली तर त्याच small / capital नियमाने, प ची p वर आणि फ ची P वर नेमणूक करावी लागेल. पण फ हा Key board वर एकाच लेटर मध्ये दिसणाऱ्या F शी जास्त संबंधीत असलेला आपल्याला वाटतो. Key board वर Ph अशी दोन अक्षरे एकत्रितपणे कुठेही दिसत नाहीत!
२) True Type Fonts आणि Open Type Fonts: यांच्या निर्मितीच्या सोई पाश्चिमात्य भाषांना योग्य आहेत तेवढ्या त्या भारतीय भाषांसाठी नाहीत. वेगवेगळ्या सोपस्कारातून वाट काढत भारतीय भाषेतील अक्षरांची चित्रे दिसतील असे साधले गेले आहे. 'हवेवर ओठांनी लिहीणे' तसे Key board मधून 'व्यंजन-स्वर-विरामांनी बोलणे' संगणकीय Fonts ना साधता आले नाही. मराठी भाषा आता जगाला हे देऊ शकेल.
३) Unicode: सर्व भाषांना संगणकात स्थान देणारी Unicode ही रचना भाषांतील चिन्हे-रेखाटन हे प्रकार हाताळते. मानवाने बायनरी सिस्टीम संगणकातून वापरायला सुरवात केली ती इंग्रजी भाषेचा आधार घेऊन, त्यामुळे इंग्रजी भाषेचे वैचारीक गुणदोषही संगणकातून प्रस्थापीत होत गेले. इंग्रजी भाषेप्रमाणेच बायनरी सिस्टीमसुद्धा चित्र-चिन्हे-खुणा यांच्या परीसरात गोवल्या गेल्या. संगणकाची सुरवात जर भारतीय भाषांतून झाली असती तर बायनरी सिस्टीम चित्र-चिन्हे-खुणा यांच्या ऐवजी ध्वनीवर बेतली गेली असती. इंग्रजी भाषेला व्यंजन-स्वर-अक्षर यात ध्वनीचा शिरकाव करता आला नाही त्यामुळे तिला उच्चारासाठी डिक्शनरी वापरावी लागते. आता बायनरी सिस्टीमचेही तसेच घडत आहे. फॉण्टची निर्मिती ते युनीकोड पर्यंतचा प्रवास आजपर्यंत आपण 'चित्र-चिन्हे-खुणा' यांना विचारात घेतच करत गेलेलो आहोत. मानवाला ज्ञात होणारे ज्ञान हे ध्वनिवर आधारभूत असतानाही आपण आजपर्यंतचा बायनरी सिस्टीमचा वापर, उपयोग आणि वावर ध्वनिवर बेतलेला नाही. 'चित्र-चिन्हे-खुणा ते ध्वनी' या प्रवासा ऐवजी तो प्रवास 'ध्वनी ते चित्र-चिन्हे-खुणा' असा व्हायला हवा होता. आजपर्यंत इंग्रजी भाषेने मानवाला भरभरून ज्ञान दिले आता तिला जे बायनरी सिस्टीम मधून देता आले नाही, किंवा देता येणार नाही ते मराठी भाषा सहज साध्य करू शकेल.
४) 'लिखित-बडबड' (Chatting): संगणकातून Short-hand सारखी लिखाणाची पद्धत सर्वच भाषांना वापरावी लागणार आहे. त्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय यांचा आराखडा प्रत्येक भाषेने आखला तर त्याचा उपयोग सर्वांना होणार आहे.
५) Standadization of typing in Windows and in Unicode: अर्थप्राप्तीचे साधन म्हणून बऱ्याच कंपन्यांनी बरेच भारतीय फाण्टस निर्माण केले. आपापल्या भाषा संगणकातून लिहीता येणे हा त्या त्या भाषीकाचा जन्मसिद्ध हक्क समजला जावा. Windows आणि Unicode यातून आपापल्या भाषेतून संवाद साधता येणे आणि संगणकाचा वापर करता येणे हे नव्या युगात अत्यावश्यक ठरले आहे. मानवाच्या भाषा बरीच चिन्हे वापरतात. उदाहरणः जपानी भाषेतील १९४५ Kanji चिन्हे आणि Katakana किंवा Hiragana ची १०७ चिन्हे, मराठीतील ३४ व्यंजने + १५ स्वर + ११ जोडाक्षरे = ६० चिन्हे आणि त्यातून साकारणाऱ्या बाराखड्यांची ४६४ चिन्हे, वगैरे. यासाठी एक निश्चित धोरण प्रत्येक भाषेने बनविणे आवश्यक झाले आहे.
नैसर्गिक मर्यादाः वरील सर्व गोष्टींशिवाय मानवाला असाध्य असलेले उच्चार हाही भाग संगणकातून ओळखता येतात. अशा सर्व भाषांना समान असलेल्या नैसर्गिक नियमांना वेगळे स्थान देता येणे शक्य आहे. उदाहरणः आपल्याला क्य उच्चार स्वतंत्रपणे करता येतो पण य्क उच्चार करता येत नाही.
शुद्ध-लेखनाच्या मंडपाखाली आता कागदाबरोबर संगणकांचाही शिरकाव झालेला आहे. शुद्ध-लेखनाची ही नवी क्षितीजे ज्या भाषा लवकरात लवकर पादाक्रांत करतील त्यांना नव्या युगात यथायोग्य स्थान मिळेल अन्यथा त्या भाषा मागासलेल्या ठरू लागतील.
कागद आल्यावर संस्कृत भाषा मागे पडली. आता संगणकांच्या आगमनामुळे मराठी भाषा मागे पडू नये असे वाटत असेल तर शुद्ध-लेखनाची व्याप्ती 'भाषेच्या-संगणकीय-वृत्तीपर्यंत' नेता आली पाहीजे. मराठी भाषेला ते सहज शक्य आहे.
आपला,
शुभानन गांगल

सविस्तर चर्चेसाठी येथे वाचा

http://maraathibhaashaa.blogspot.com/

Post to Feed

चाचणी घेणे आवश्यक
शुद्धलेखनाचा बाऊ?
इंग्रजीला
उच्चारता येत नाहीत?
ह्यावरून आठवले
ह्याच विशिष्ट उच्चार पद्धतीवर
बेंडुळम
काही प्रतिसाद अप्रकाशित
उत्कृष्ठ लेख
भाषांचे उच्चारसंच आणि सहजता

Typing help hide