नान

  • २ वाट्या मैदा, १/४ चहाचा चमचा मीठ, १/२ चहाचा चमचा बेकिंग पावडर
  • १ चहाचा चमचा कोरडे यिस्ट, १चहाचा चमचा साखर, १/२ वाटी कोमट पाणी
  • १ मोठा चमचा तेल, २ मोठे चमचे दही, २ मोठे चमचे दूध
  • थोडे बटर वरून लावण्यासाठी
१ तास
४ ते ५ नान

एका वाडग्यात यिस्ट व साखर कोमट पाण्यात घालून  उबदार जागी ५ ते ७ मिनिटे ठेवणे.
एका मोठ्या तसराळ्यात मैदा घेणे त्यात मीठ, बेकिंग पावडर घालून एकत्र करणे. नंतर त्यात यिस्टचे मिश्रण घालणे.एकत्र करणे व चांगले मळणे.मळायला अजून पाणी हवे असले तर पाण्याऐवजी दह्याचे पाणी किवा ताक घेणे.
एक सुती फडके ओले करून पिळून घेणे व ते ह्या तसराळ्यावर घालून गोळा झाकून  २५ ते ३० मिनिटे उबदार जागी ठेवणे.
अवन १५० अंश से. ला प्रिहिट करणे.
एका बेकिंग ट्रेला तेलाचा हात लावून घेणे किवा त्यावर बेकिंग पेपर पसरून घेणे.
साधारण अर्ध्या तासानंतर फडक्याखालील गोळा थोडा फुलून येईल आणि नरमही होईल. ह्या गोळ्याचे ४ ते ५ गोळे करणे. पोळपाटावर मैदा भुरभुरून घेणे व एकेक गोळा घेऊन लांबट आकाराचे नान जरा जाडसरच लाटणे. एका वेळी २ ते ३ नान बेकिंग ट्रेमध्ये लावून घेणे.
१५० अंश से. वर १० ते १५ मिनिटे बेक करणे. हलका गोल्डन ब्राउन रंग आला पाहिजे. नंतर अवन मधून काढून ब्रशने किवा चमच्याने बटर लावणे.गरम गरम नान वाढणे.

गरम गरम नान बटरचिकन किवा मटरपनीर किवा व्हेज कोल्हापुरी इ. कशाही बरोबर 'हादडणे'. 
वरील साहित्यात ४ ते ५ मध्यम नान होतात.

.