मंथन पारितोषिक विजेता - लिपिकार

लिपिकार या टंकलेखन प्रणालीला नुकतेच मंथन पारितोषिक मिळाले.
अर्थात मनोगत, गमभन   किंवा इंडिक इनपुट एक्शिंटन वापरणाऱ्यांना एकेका शब्दाकरता इतके कष्ट करण्याची कल्पनाही सहन होणार नाही. यात S एकदा दाबला की "स" उमटतो, दोनदा दाबला की "श" आणि "ष" हवा असेल तर S तिनदा!! दाबावा लागतो. तीच गोष्ट "त" ची. t हे अक्षर एकदा दाबले की "त", दोनदा "थ", तिनदा "ट" तर "ठ" गाठायला चारदा tttt करावे लागते. अशाने कळफलकाला तडे जाण्याचा धोका लक्षात घेतला तरी एकदा सहज म्हणून वापरून पाहायला काहीच हरकत नाही. मायबोलीत नवीनच टंकलेखन करू इच्छिणाऱ्यांना कदाचित ही पद्धत सोयीची वाटू शकेल. लिपिकारांचे अभिनंदन.