मुद्राराक्षसाचं दिवाळं ( अं हं- मुद्राराक्षसाची दिवाळी) फराळ क्र.(१)

आजकाल सगळीकडे मंदीचं वातावरण असलं तरी ह्या मुद्राराक्षसाकडे मात्र नेहेमीच भरपूर असतं... भरपूर चुका असतात सगळ्यांना हसवायला....

  • डॉक्टरच्या तुलनेत रुपया घसरला.
  • वीज कर्मचाऱ्यांचा आज भूकंप
  • वीज कर्मचाऱ्यांना सात हजारांचा घोणस
  • बिहारला जाणाऱ्या क्रेन रद्द.
  • भारताचे चांद्रयान चंद्रावर झोपले
  • तीन प्रतिष्ठानांवर जायफळ अधिकाऱ्यांच्या धाडी
  • राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सहा सुवर्णबदक!

        (डॉलरच्या)(संप)(बोनस)(ट्रेन)(झेपावले)(आयकर)(सुवर्णपदक)

(क्रमशः)