विनोदी महिलांदोलन....

विचार करा (फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा) की जर महिला पुरुषांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या तर काय काय घडेल? त्याचा हा विनोदी आढावा....

  • पुण्यात महिलांची पुरुषांवर लाटणे फेक. अनेक पुरुष डोक्यावर टेंगुळ येवून जखमी.
  • अनेक पुरुष घरी जायला घाबरत आहेत. अनेक दिवस ऑफिसातच मुक्काम ठोकून.
  • काही पुरुषांना या आंदोलनाची आधीपासूनच कल्पना असल्याने ते पोळपाट बॅगेत लपवूनच ऑफिसला निघाले होते. त्यामुळे लाटण्यांचा मारा त्यांना काही प्रमाणात परतवून लावता आला.
  • अनेक ठिकाणी लाटण्यांवर बंदी घालण्याची पुरुषांची मागणी

     

  • महिलांच्या काही मागण्या कोर्टासमोर सादरः

             > आठवड्यातून दोन दिवस स्वयंपाक नवऱ्यांनी करावा

            > मंगळसूत्र पुरुषांना अनिवार्य करा.

            > लग्नानंतर कपाळावर पुरुषांनी टिकली सारखे गोंदून घ्यावे. त्यासाठी लग्न समारंभात नवरा-कप्पाळ-गोंदण असा 

              कार्यक्रम सामाविष्ट  करावा.

            > स्त्रीया साडी घालणार नाहीत. शर्ट पँण्ट घालतील.

  • महिला पोलिसांचा  पुरुषांवर  लाठीचार्ज. पुरुष जखमी. अनेक पुरुष चंद्रावर जाण्याच्या तयारीत. तेथे घर बांधून राहाणार असल्याची एका पिडीत नवऱ्याची प्रतिक्रीया.