मुद्राराक्षसाचं दिवाळं ( अं हं- मुद्राराक्षसाची दिवाळी) फराळ क्र. (२)

  • आजकाल चाललेल्या वाईट घटना पाहता, समाजाचे मोठे नैतिक अपचन झाले आहे, असे वाटते, असेही ते म्हणाले.
  • दागिन्यांनी सजलेले आपले रेखीव मन ती आरशात ट्याहाळत होती.
  • पाकिस्तानात फक्त पंधरा मिनिटात बारा घटस्फोट, चोवीस सुखी.
  • ओबामांच्या हत्येचा घट उधळला.
  • तलाठ्यास चाळीस हजाराची काच खातांना रंगे हाथ पकडले.
  • अमेरिकेतील आर्थिक बंदी मुळे हजारेंचे नुकसान.
  • तार्किक मंदीमुळे जगभरातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.
  • रोज तीन नोकऱ्या खाणारा तो, आज जेवलाच नाही.
  • ओबामांच्या हत्येचा कट वितळला.
  • चिघळलेली परिस्थिती पाहता, तेथे विचारबंदी लागू केलेली असून, सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत कोणाही व्यक्तीला विचार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

(अध:अतन)(तन,न्याहाळत)(स्फोट, मृत्युमुखी)(कट)(लाच)(मंदी, हजारोंचे)(आर्थिक)(भाकऱ्या)(उधळला)(संचार)