फ्राईड राईस

  • १. ५ वाटी कोबी लांब चिरून
  • गाजरे १/२ वाटी लांब पातळ चिरुन
  • १/२ वाटी फरसबी चौकोनी चिरून
  • १/२ वाटी मटारदाणे
  • १/२ वाटी फ्लॉवर बारीक चिरून
  • २ कांदे लांब चिरून+ २ कांदापाती बारीक चिरुन
  • आले बोटभर बारीक चिरुन, ४, ५ लसूण पाकळ्या बारीक चिरुन, ३, ४ मिरच्या बारीक चिरुन
  • सोया सॉस १ च. चमचा
  • २ टेबलस्पून तेल, मीठ व अजिनोमोटो चवीनुसार
  • २ वाट्या तांदूळाचा भात
५ मिनिटे
४ जणांना

२ वाट्या तांदूळाचा पाणी कमी घालून भात जरा फडफडीत शिजवून घ्यावा. एका ताटात शिजलेला भात मोकळा करून ठेवावा.
तेलावर कांदा परतून घ्यावा, शिजत आला की गाजर, फ्लॉवर, फरसबी, मटार घालून परतावे, कोबी घालून परतावे. आले, लसूण घालून परतावे. १ लहान चमचा सोया सॉस घालून परतावे. मीठ व अजिनोमोटो घालावे आणि परतावे. मीठ व अजिनोमोटो दोन्ही खारट असते हे लक्षात ठेवून प्रमाण घालावे.
भाज्या पूर्ण शिजवू नयेत, थोड्या कचवट राहू द्याव्या.
मोकळा शिजलेला भात ह्या भाज्यात घालावा व शीत न मोडेल असे हलक्या हाताने परतावे. एक दोन वाफा येऊ द्याव्यात. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कांदा पात घालावी.
फ्राइड राईस तयार आहे!

राईस खाताना सोया सॉस, चिली सॉस जसे हवे तसे घ्यावे.

.