`स्टार माझा`वर 'ब्लॉग माझा'

मित्रहो,

'स्टार माझा'नं घेतलेल्या 'ब्लॉग' स्पर्धेत आपल्या काही सदस्यांसह अन्य काही जणांना बक्षीसं मिळाली. पुरस्कार प्रदान कार्यक्रम गेल्या सोमवारी मुंबईत झाला. गेल्या शनिवारी हा कार्यक्रम 'स्टार माझा'वरून प्रसारितही झाला. ज्यांना तो पाहायला मिळाला नाही, त्यांच्यासाठी उद्या, शुक्रवार १४ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता तो पुन्हा पाहण्याची संधी आहे. नक्की बघा!

हा कार्यक्रम 'स्टार माझा'च्या साईटवर दुवा क्र. १ मुखप्रुष्ठावरील आयपी टीव्हीवरही त्याच वेळी ऑनलाइन पाहता येईल. ऑफिसला खड्ड्यात घालायचं, की घरचं बिल वाढवायचं ते तुम्ही ठरवा!

स्पर्धेचा निकाल आणि विजेते ब्लॉग इथे दुवा क्र. २ वाचा.