मुद्राराक्षसाचं दिवाळं ( अं हं- मुद्राराक्षसाची दिवाळी)- फराळ शेवटचा!

  • अलौकीक संबंधांतून तरूणाचा खून.
  • हिमवृष्टीमुळे काश्मिरात परिक्षेचे वेळापत्रक कडमडले.
  • लहान मुलांमध्ये वाढते आहे, मधुचंद्राचे प्रमाण.
  • फ्लॅटचे दर ३० टक्क्यांनी नटले.
  • यापुढे शिधापत्रिकेत कुटुंबप्रमुखाचे मायाचित्र.
  • त्या वेळी मी शर्ट घालायला नको होता- गांगुलीची प्रतिक्रिया.
  • सोने  घडवण्याची ताकद साहित्यिकांमध्ये-  उपमुख्यमंत्र्यांचे मत.
  • यापुढे लग्नपत्रिकेत कुटुंबप्रमुखाचे छायाचित्र.

(अनैतिक, कोलमडले, मधुमेहाचे, घटले, छायाचित्र, काढायला, मने जोडण्याची, शिधापत्रिकेत)

दिवाळीचा फराळ आता संपला.

पुन्हा मुद्राराक्षसाला घेवून मी येईलच,  एका नव्या "चुकलेल्या" शिर्षकासह आणि नव्या कल्पनांसह.

आजचा फराळ कसा होता ते जरूर कळवा, प्रतिसांदाद्वारे. तोपर्यंत सोपस्कार... नाही.. नाही चुकले... तोपर्यंत नमस्कार.

---- क्षणाचा सोबती.