नोव्हेंबर
१८
२००८
जिन्नस
- पोळ्या (शक्यतो शिळ्या. ताज्याही चालतील.)
- प्रत्येक पोळीगणिक १/२ छोटा चमचा खाद्यतेल
- तिखट
- काळा मसाला
- मीठ (सर्व काही चवीप्रमाणे)
मार्गदर्शन
१) तेल, तिखट, मीठ आणि काळा मसाला एका वाटीत एकत्र करून घ्यावे.
२) एक पोळी घेऊन तिच्या दोन्ही बाजूंना हे मिश्रण फासावे
३) गॅसची आच गरजेप्रमाणे लहान-मोठी करत तव्यावर पोळी शेकावी. पोळी चांगली कडक झाली पाहिजे मात्र जळू नये.
४) अशा पद्धतीने चांगली कडक झालेली पोळी खमंग खाकऱ्यासारखी लागते.
टीपा
तिखट-आंबट चटणीसोबत गरम गरम खाकरा खायला खूप मजा येते.
माहितीचा स्रोत
धाकट्या बहिणीबरोबर केलेले प्रयोग
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
नाश्ता
प्रे. मराठीप्रेमी (मंगळ., १८/११/२००८ - ०९:५६).
छान कल्पना
प्रे. सृष्टीलावण्या (मंगळ., १८/११/२००८ - १३:२४).
धन्यवाद
प्रे. ऋचा मुळे (मंगळ., १८/११/२००८ - १३:४४).