अजित पवार यांची कामगिरी

             सुरेश कलमाडी यांनी स्थानिक प्रश्न सोडविण्याऐवजी क्रीडाक्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केले आहे म्हणून त्यांच्यावर टीकाही होते. तरीसुध्दा, ते काम करतात याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.
मंत्रिमंडळातील जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, अशोक चव्हाण हे मंत्रीही सुजाण आहेत व त्यांनी स्वतःच्या खात्यात काही ना काही टप्पा गाठला आहे, असे म्हणण्याला वाव आहे. खुद्द विलासराव देशमुख व आर. आर. पाटील हे देखील शहाणे लोक आहेत व त्यांनी कार्यक्षमता दाखविली आहे. 
             या पार्श्वभूमीवर पाटबंधारे मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे ठसठशीत असे कार्य दिसत नाही. 
त्यांच्याबाबत लक्षात येतात त्या या गोष्टी-
१. निव्वळ वाद घालण्यात रस. 
२. प्रश्न सोडविण्याची तळमळ नाही.        
२. सतत आम्हाला विश्वासात घेऊन काम केले जात नाही, हा कलमाडींवर आरोप.(विश्वासात घेऊन काम केले जात नाही, याचा अर्थ काय, हे सांगताना खुद्द अजित पवारांचाच गोंधळ उडेल.) 
३. काकांच्या बोटाला धरून चालणे व स्वतःचे मत नसणे. काकांएवढी प्रगल्भता नसणे.
४. बारामतीच्या वातावरणात राहून आणि स्वतःच्या काकांची व इतरांची मते ऐकून पुण्याबद्दल द्वेषभावना .(हे विधान स्पष्ट करण्याची गरज नसावी.) 
५. अभ्यासशून्य वक्तव्ये( २००३ साली त्यांनी 'पुणेकरांनी दिवसातून एकदाच आंघोळ करावी', असे 'आवाहन' केले होते. त्यावेळी पुण्याच्या नगरसेवकांनी त्यांची रेवडी उडविली होती.)
            तुलनेने त्यांचे काका शरद पवार व चुलत बहीण सुप्रिया सुळे हे कामगिरी करण्याबाबत खूप पुढे आहेत.

खरोखरीच, अजित पवार यांनी भरीव कामगिरी केलेली नाही ?
की कामगिरी केलेली आहे पण जनतेसमोर त्यांचे कार्य आलेच नाही ?
योग्य जाहिरात करण्यात ते कमी पडत आहेत का ?