नोव्हेंबर २० २००८

हसले होते निरोप घेऊन निघताना...

हसले होते निरोप घेऊन निघताना
बांध तरीपण फुटला मागे वळताना

आठवणींची गर्दी झाली दाराशी
काल तुझ्या खोलीत रिकाम्या बघताना

तशीच आहे खोली अस्ताव्यस्त तुझी
अनुभवते मी तुला तिथे वावरताना

हसते आता आठवून मी स्वतःशी
दिसायचा तू गोड किती घाबरताना

सांगत होते तुझ्याच खोड्या उशीस मी
भास तुझा अन झाला कूस बदलताना 

सांग कुठे या अश्रूंना मी लपवावे
अवचित येती गालावरती हसताना

काय खुशाली नभास या मी सांगावी 
काय इथे   घडणार तरी तू नसताना

अनिरुद्ध अभ्यंकर

Post to Feed

शेवटच्या ओळी खूप आवडल्या
चांगली जमलेली कविता
त्याला माहित असाणार
चांगली जमलेली कविता - सहमत
बरोब्बर!
आवडली
छान...
वा
सुंदर रचना
सुरेख
तशीच आहे खोली अस्ताव्यस्त तुझी
कविता आवडली..
अगदी छान, प्रासादिक
असेच म्हणतो
धन्यवाद!!

Typing help hide