काकडीचा डोसा

  • १ मध्यम आकाराची काकडी
  • १-१/२ ते २ वाटया तांदळाचे पीठ
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • १ इंच आले
  • हिंग,जीरे,मीठ, चिरलेली कोथिंबीर मूठ भर
  • पाव चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा सोडा
३० मिनिटे
५ ते ६ डोसे

      प्रथम काकडी सोलून किसून घ्यावी.मिरच्या,आले,जीरे,हिंग वाटून घ्यावी. मग सर्व जिन्नस पाण्यात एकत्र कालवून घ्यावे. पीठ साधारण भज्याच्या पीठपेक्षा जरा पातळ असावे.  गरम तव्यावर  धिरड्याप्रमाणे पातळ डोसे घालवेत. मध्ये व कडेला तेल सोडावे. उलटून परत खमंग भाजावे. सॉस किंवा चटणीसोबत खावे.  

नाहीत.

स्वतः सौ. संगीता खेडकर