महाराष्ट्राच्या मुख्य/उपमुख्यमंत्र्यांचे राजीनामे

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचलीः बातमीचा गोषवारा पुढीलप्रमाणे

विलासराव, आर. आर. पाटील यांचा राजीनामा

मुंबई, ता. १ - मुंबईतील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर आता राजकीय बळींचीही मालिका सुरू. दिल्लीत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव ठरल्यानंतर विलासरावांच्या राजीनाम्यावर उद्या अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता. मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे व पंतप्रधानांच्या कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ; तर महसूलमंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री अशोक चव्हाण व सहकारमंत्री पतंगराव कदम हेही नेतृत्वपदाच्या शर्यतीत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आज मुंबई दौरा आहे, उद्या सकाळी त्या राजभवनात बैठक घेणार आहेत. तोपर्यंत मुख्यमंत्रीबदलाचा निर्णय होणार नाही, असे सांगितले जाते. दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याची निवड होईल, त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होईल, असे समजते. मुख्यमंत्री पदाचे नाव दिल्लीतच ठरणार आहे;