डिसेंबर २००८

दासबोधः पत्रद्वारे अभ्यास

आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य, आंतरिक समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजवत नाही आणि ते शक्य ही होत नाही.

अशावेळी काही व्यावहारीक विचार सांगणाऱ्या आणि आचरणात आणण्यासारख्या 'ग्रंथराज दासबोधाचा' खूप उपयोग होतो, असा स्वानुभव आहे. दास बोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात नैराश्य प्रसंगी मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बल देतात. आत्मविश्वास वाढवतात. "साधेच ओषध पण अत्यंत गुणकारी" असा अनेक अभ्यासार्थींचा अनुभव आहे. आजपर्यंत ८८, ००० लोकांनी या ज्ञान पाणपोईचा लाभ घेतला आहे.

आता श्रवण केलियाचे फळ / क्रिया पालटे तात्काळ - अशी निः संदेह ग्वाही स्वःत समर्थच देतात आणि अनेकांचा तसा अनुभव आहे.

श्री. समर्थ सेवा मंडळाच्या 'श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन' या उपक्रमामुळे  दासबोधाचा अभ्यास आता सहज शक्य झाला आहे.

- हा 'अभ्यासक्रम आहे - पारायण नाही. समर्थांना पारायण नव्हे आचरण अपेक्षीत आहे.

- हा स्वा-ध्याय आहे, यासाठी गुरू नाही( दासबोध ग्रंथ हाच गुरू ), पूजा-अर्चा, भजन-सत्संग अथवा प्रवचनाला जाण्याचे प्रयोजन नाही. तासिका नाही, चाचणी नाही, सराव अथवा पाठांतर नाही. स्वाध्याय अशासाठी की त्यामुळे अभ्यासाला शिस्त लागते.

-दर महीन्याला एक याप्रमाणे पहील्या वर्षी 'प्रवेश' चे १२ स्वाध्याय, दुसऱ्यावर्षी 'परीचय' चे १२ स्वाध्याय आणि तिसऱ्या वर्षी 'प्रबोध' चे १२ स्वाध्याय, असे एकूण ३६ स्वाध्याय घरच्या घरी पुस्तकात बघून सोड्वायचे आणि नेमून दिलेल्या 'समिक्षकांकडे' पोस्टाने पाठवायचे! इतके सोप्पे!

-एक स्वाध्याय लिह्ण्यास साधारण ५० मिनिटे लागतात. ६०% प्रश्न हे 'एका वाक्यात उत्तरे ' या स्वरुपात!

- परीक्षा नाही, गुण/ श्रेणी नाही, आचरण आणि प्रचिती हेच गुणापत्रक!

- प्रवेश फी नाही, प्रवेश परिक्षा नाही.

-प्रवेश पात्रता- वयाची अट नाही, मराठी लिहीता- वाचता येणे, आणि नवीन शिकण्याची आवड,  एवढेच अपेक्षीत

-पुस्तके अत्यल्प किंमतीत उपलब्ध( एकूण ३ वर्षांकरीता अंदाजे ७५ रुपये + ट. ख़. ). पुस्तकांचा, लेखन साहीत्य, आणि टपाल खर्च अभ्यासार्थीने करणे अपेक्षित.

- प्रवेश प्रक्रीया सुरू - जानेवारी २००८ साठी प्रवेश चालू आहे.

पत्रव्यवहारासाठी आणि अधिक माहीतीसाठी आपल्या पत्त्याच्या पाकीटासह -खालील पत्त्यावर संपर्क करावा-

'श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन' श्रीसमर्थ सोसायटी, धन्वंतरी सभागृहाच्या मागे,  पटवर्धन बाग,  पुणे -४११००४

अथवा - ई पत्र पाठ्वावे- दुवा क्र. १

Post to Feedमेल
शिबिर
सज्जनगड मासिक महत्त्वाचे

Typing help hide