अर्थाचा विनोदी अनर्थ (गंभीर विनोदी चर्चा : १)

अर्थाचा विनोदी अनर्थ (गंभीर विनोदी चर्चा : १)

अर्थाचा विनोदी अनर्थ या मालिकेत यापूर्वी मी प्रसारमाध्यमांविषयी विनोदी कथा लिहिली होती. आता या नव्या चर्चात्मक विनोदी लेखनात आपल्याला तीन पात्रे भेटतील. कधी तिघेही एकत्र तर कधी दोघे तर कधी एकेकटे.

मिस्टर विनोद विरंगुळे, मिस्टर गंभीर विचारे, मिस चर्चा गुऱ्हाळे ही ती तीन मजेदार व्यक्तीमत्वे.

या तीघांचे जे प्रताप  किंवा संवाद (की वाद) असतील त्याला आपण म्हणूया "गंभीर विनोदी चर्चा" आणि या चर्चेत ते करतील अर्थाचा विनोदी अनर्थ.

तर आपला 'विनोद विरंगुळे' एकदा सहज रस्त्याने जात होता.  

एका एस. टी. डी. बुथवर तो अचानक थबकला. खिशात हात घालून पैसे आहेत का ते तपासले. अचानक आनंदला. बुथवर 'आनंद अवकाळे' बसला होता.

आनंदः  काय रे विनोद! कसे काय? आज एकदम आनंदात? नाव विनोद असून तू नेहेमी गंभीर असतोस. आज आनंदी आहेस. ते कसे काय?

विनोदः तू जरा थांब. मला फोन करायचे आहेत.

असे म्हणून विनोद फोन करू लागला. आधी त्याने केरळ मध्ये फोन केला. नंतर तामिलनाडू, हैदराबाद, काश्मीर, दिल्ली, पुणे, मुंबई.. याप्रमाणे एकाही प्रदेशाला सोडले नाही. सगळ्या ठीकाणी फोन केलेत. आनंद दु:खात बुडाला, कारण एवढे सगळे फोन केल्यावर विनोद पैसे देईल का ती शंका त्याला येत होती. पण यावेळेला विनोद आनंदचे ऐकेनासा झाला.

विनोदः वा वा वा! काय सोय केली आहे शासनाने. मजा आली. मी तामीलनाडू च्या एयरपोर्ट्वर, हैदरावाद च्या माझ्या मित्राला, असे सगळे फोन आज शासनामुळे करू शकलो.

असे म्हणत त्याने आनंद समोर एक रुपया टिकवला.

आनंदः हे काय? एक रुपया? फक्त? अरे शंभर रुपये झालेत.

विनोदः शंभर रुपये कसले? तू या फोनसमोर काय सूचना लावली आहेस? वाचः एक रुपयात संपूर्ण भारतात बोला. मी पूर्ण भारतात बोललो. हा घे एक रुपया.

आनंद: अरे असे शब्दशः अर्थ घेतल्याने त्याचे अनर्थ होतात बाबा. चल दे शंभर रुपये. नाहीतर मी एक रुपयात पोलिसांना बोलावीन.

विनोदः (शंभर रुपये आनंदला देत म्हणाला) अशा दुकानासमोर पाट्या लावायच्या आनी गिऱ्हाईकांना फसवायचे हे बरोबर नाही. मी तक्रार करीन. ग्राहक मंचाकडे. चल येतो आता.

विनोदने चर्चाला आपल्या मोबाईलवरून फोन लावला: "चर्चा. लवकर निघून ये. मी एक रूपयात संपूर्ण भारतात बोलायचा नादात शंभर रुपये घलवून बसलो. आता माझेजवळ घरी जायला पैसे नाहीत. तू प्लीज पैसे घेवून ये "

(क्रमशः)