एका दुर्दैवी कमांडोची व्यथा -

सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पाठविलेली मेल, नेवीतील माझ्या एका मित्राने मला forward केली. त्याचे शब्दशः भाषांतर खाली देत आहे.
---------------
१. माझ्या विभागात (unit) माझा अतिशय सज्जन, कर्तव्यकठोर, कमांडोसारखा एक आधिकारी होता. त्याचे नांव कप्टन राम सिंह जेष्ठतावर्ष (seniority) २००३. (अपरिहार्य कारणास्तव मूळ नाव बदलले आहे). त्याची (NSG मध्ये) राष्ट्रीय सुरक्षा गार्डमध्ये जाण्याची इच्छा होती. आम्ही बढतीच्या धोरणात थोडा बदल करून त्याच्या तीव्र ईच्छाशक्तिमुळे अलिकडेच ह्या वर्षी त्याला NSG मध्ये आधिकारी म्हणून बढती देण्यात आली.
२. 27 नोव्हेबरच्या दिवशी दहशतवादाशी लढा देण्यासाठी पाठविण्यात आलेला कमांडोपैकी तो एक होता. ओबेराय होटेलमध्ये सुरू केलेल्या कारवाई मध्ये त्याला ताबडतोब पाठविण्यात आले. त्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता १८ व्या मजल्यावरील दहशतवाद्यापैकी एकाशी त्याला सामना करावा लागला. त्या दहशतवाद्याने खोली बंद करून घेतल्याने त्याने स्फोटके वापरून दरवाजा उघडला. पण त्याला आत ग्रेनेड फेकणे शक्य होण्यापूर्वीच त्या दहशतवाद्याने बाहेर ग्रेनेड फेकले. त्याचा त्या आधिकाऱ्याच्या अगदी समोरच स्फोट झाला. ग्रेनेडचे स्प्लिंटर्स शरीरात घुसण्यामुळे सर्वत्र जखमा झाल्या व तो बेशुद्ध पडला. अनेक ठिकाणी जखमी झालेला तो एकच अधिकारी त्या संपूर्ण मोहिमेत होता. उन्नीकृष्णन तर त्याच मोहिमेत ठार झाले होते.
३. मुंबईमधील एका हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. केवळ एक सोडून सर्व स्प्लिंटर्स त्याच्या शरिरातून काढून टाकण्यात आले. तो एक कण मात्र त्याच्या डाव्या डोळ्यात आरपार घुसला आणि त्याने तो डोळा कायमचा गमावला. नेत्रदाताच्या मदतीनेही त्यावर उपचार होऊ शकत नाही. एवढ्या महत्वाच्या बातमीचा जाहीर निवेदनात तसेच कोणत्याही मिडीयाने दिलेल्या माहितीत ह्याचा साधा उल्लेखही नव्हता.
४. तो आधिकारी आता सुद्धा मुंबईच्या हॉस्पीटल मध्ये एकाकी आहे. त्याच्या डाव्या डोळ्यातून अजून रक्तस्त्राव होत आहे. आता सर्व राष्ट्रीय सुरक्षा गार्डस दिल्लीत परत गेले आहेत. त्याच्यवर ह्यापुढे कसा औषधोपचार होणार, त्याचे भवितव्य काय हे त्याला समजत नाही. "माझा डोळा वाचवा मला सैन्यात नोकरीत रुजू व्हायचे आहे" असा एकच आक्रोश तो करत आहे. त्याचे सांत्वन करण्यासाठी NSG मधील कुणीही त्याच्याजवळ नाही. त्याच्या नातेवाइकाना कुणाकडे मदत मागावी हे समजेनासे झाले आहे. लक्षात घ्या, सैन्याधिकारी तसेच त्या बटालियनच्या प्रमुख आधिकाऱ्याने १ डिसेंबर पर्यंत त्याची साधी भेटही घेतली नाही. जेव्हा नजीकच्या वरिष्ठ आधिकाऱ्याच्या नजरेस ही गोष्ट आणण्यात आली तेव्हा त्यानेही ह्याची साधी चौकशीसुद्धा न करता त्याला, "मिडीयामध्ये कुणालाही मुलाखात द्यायची नाही व कुणापाशीही चकार शब्द देखील काढायचा नाही" असे बजावले.
५. अतिशय भयंकर घृणास्पद व निंदनीय ही घटना आहे. जर एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीत असे घडत असेल तर सामान्य माणसाच्या जीवनात असे घडल्यास काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. जर शूरवीर म्हणून ज्याना राष्ट्र मानवंदना देत्ते त्यांच्या बाबतीत हे घडू शकते तर इतरांची परिस्थीती काय असेल. NSG चा यामध्ये कोणता हेतू होता हे समजत नाही. तरी सुद्धा cannon fodder प्रमाणे NSG ने त्यांच्या सहकार्यांना अशा प्रकारे वागविणे न पटणारे आहे.
६ सुदैवाने माझी रेजिमेंट मुंबईतील त्या आपरेशनच्या जवळच आहे. मी त्याला मदत करणासाठी माझा रेजिमेंटला प्रवृत्त केले. शेवटी तो श्रेष्ठ भारतीय सैन्यातील एक अधिकारी आहे. दुर्दैव म्हणजे मी त्याचा डोळा वाचवू शकलो नाही. आणि मी त्याला कोणतीही कार्यालयीन मान्यता देऊ शकत नाही.
७. सीमेवरील सैन्यातील सर्व आधिकाऱ्यांना माझे सांगणे हेच, की पुढे येऊन धैर्याने कुणाबरोबरही लढा पण जखमी अवस्थेत राहू नका. त्यापेक्षा मरणे बरे. कारण जर तुम्ही जगलात तर आयुष्यभर क्षणोक्षणी किती मरणप्राय वेदना सहन कराव्या लागतील याला क्षिती नाही.
---------------
NSG चा यामध्ये कोणता हेतू होता हे समजत नाही.
Play down our casualities हे सरकारचे धोरण इतर बऱ्याच वेळा दिसून येते. NSG ची अशा तऱ्हेची प्रतिक्रिया ही देखील त्याच धोरणाचा एक भाग असेल का?