पॅरिस मधील थालीपीठ

आजचा आल्या पासून दुसरा शनिवार, सकाळ पासून नुसता लोळत पडलो होतो. दुपारी घरच्या बरोबर बोलून ज़ले होते. तेव्हां बोलताना थालीपीठ करा असे सुचवले बरोबर थोडेच पीठ मळून बघा हे सांगायला न विसरता. भारत सोडल्या पासून नुसता भात आणि पाव पैकी काही तरी खाणे चालू होते , मग ठरले आज थालीपीठ करायचे. जीवनातील हा पहिलाच प्रसंग होता पीठ मळून काही तरी बनवायाचे. त्यात थालीपीठ म्हणजे एकदम आवडीचा पदार्थ, त्यात घरून अगोदरच थालीपिठाचे पीठ दिलेले असल्यामुळे उठून लगेच तयारीला लागलो.

अस्सल मराठी पदार्थाच्या तयारीला फक्कड मराठी गाणी लावली आणि खालील प्रमाणे सगळे लागणारे पदार्थ घेतले :

१. थालीपिठाचे पीठ

२. लाल तिखट

३. जिरे

४. लसूण

५. मीठ

६. साखर

७. बारीक चिरलेला कांदा

८. हळद

९. तेल

१०. पीठ मळण्यासाठी पाणी

एक खोलगट भांडे घेऊन त्यात १ ते ८ पदार्थ टाकून त्यात थोडे - थोडे पाणी टाकत मी पीठ मळण्याचे काम सुरू केले. म्हणावे असे अजुन पीठ दिसत नसल्यामुळे पाणी टाकत पीठ मळने चालूच होते. थोड्याच वेळात आता ते चांगलेच चिकट बनल्याचे लक्ष्यात आले. मग पटकन आटवले आता थोडा तेलाचा हात फिरवून पीठ बनेल, पण त्याच्यावर ह्या गोष्टीचा काहीच परिणाम होईना. कधीतरी ऐकलेली पीठ आणि पाणी टाकत पीठ मळता न आल्याची फजितिचि कहाणी आठवली. पण मी धीर न सोडता परत थोडे पीठ टाकत टाकत मळत होतो. ह्याचा आता चांगला परिणाम होत होता. पीठ चांगले जमू लागले होते. आता तेलाचा थोडा हात फिरवातच त्याचे छान गोळा बनला होता.

निम्मी लढाई सर केल्याचा आनंद जाला होता.

आता ३ ते ४ थालीपीठ बनतील येवडे पीठ तयार होते, त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून जिंदगीतील पहिले थालीपीठ थापायला घेतले. मी ज्या हॉटेल मध्ये राहत होतो त्यानी मला एक तवा सारखे दिसणारे एक भांडे दिले होते. ते भांडे तापायला ठेवले आणि थापलेले थालीपीठ तवा गरम ज़ालयावर टाकले. थोडा पाण्याचा हात फिरवून घेतला आणि एका खरपूस अश्या थालीपिटाची मनात अपेक्षा करत थोडा वेळ थालीपीठ बाजून देऊ लागलो.

थोड्या वेळाने थालीपीठ उ लतण्याचा मी असफल प्रयत्न पण करून पाहिला पण काही जमले नाही. मग वाटले अजुन थोडे भाजून द्यावे. परत थोड्या वेळाने चेक केले तरी तेच. आता थोड्याच वेळात जळल्याचा वास सुटला, पण तव्यतिल थालीपीठ जागचे काही हलत न्हवते. क्षणभर सुरवातीला तेलाच्या ऐवजी फेवी-स्टिक लावले का असा विचार आला. मनाची नुसती चरफड होत होती. काही केल्या थालीपीठ तव्यातून निघत नाही असे लक्ष्यात आल्यावर मी सुरी घेऊन त्याला तव्यातून काढयेपर्यंत पॅरिस मध्ये ३ डिग्री तापमाणात मला घाम सुटला होता. कसे बसे थालीपीठ ताव्यातुन काढून, तो जळालेला तवा भिजत घातला. आता भूक जोरात लागली होती पण खायचे तर थालीपीठ असे ठरवले.

एकंदरीत प्रकारात हॉटेल वल्याची जास्तच चीड आली होती, तसाच चिडून हॉटेल च्या स्वागत कक्ष्यात गेलो. त्यानी नेहमी प्रमाणे हसत मुखाणे फ्रेंच मध्ये स्वागत केले. त्याला दाद न देता मी सरळ त्याना नॉन-स्टिक तव्याची मागणी केली. पण हॉटेल मध्ये नॉन-स्टिक तवा नाही, असे सांगत मला हसतमुखाने नारळ दिला तो ही फ्रेंच मध्ये. मग आमची वरात आम्ही जवळच्या सुपरे-मार्केट मध्ये काडली. तिथून एक नॉन-स्टिक तवा विकत घेऊन आलो. परत सुरवात करायच्या अगोतेर् पहिले जळालेले थालीपीठ दिसले आणि एक भीती परत मनात चमकून गेली. परत थालीपीठ थापुन नॉन-स्टिक तव्यावर गरम करू लागलो. नॉन-स्टिक तव्याने आपले काम चोख केले आणि मी केलेले दुसरे आणि खाता येईल असे पहिले थालीपीठ तयार जाले. अत्यंत स्वादिष्ट असे थालीपीठ खाउन हे लिहायला घेतले.

रात्रीच्या थालीपिठाचे पीठ तयार आहे त्यामुळे आता निवांताच आहे....