माज !

कालचा संदर्भ थोडा आज आहे ,

आणि याचा जीवनाला 'माज' आहे ॥

कोणत्या स्वप्नातही मुमताज नाही,

मालकीचा एक माझ्या 'ताज' आहे ॥

आणि याचा जीवनाला माज आहे ॥

कालच्या काळातले तात्पर्य थोडे,

अन उद्याचा तोकडा अंदाज आहे॥

आणि याचा जीवनाला माज आहे ॥

सात्त्विकाचा ध्यासही आहे जरासा,

अन जरासा रांगडासा बाज आहे॥

आणि याचा जीवनाला माज आहे ॥

आतले काहीतरी लपवू पाहातो

माहिती सगळ्यांस माझे 'राज' आहे ॥

आणि याचा जीवनाला माज आहे ॥