गोदावरी नदीला सलाईन लावून प्राणवायू लावला

कोपरगावची धार्मिक व पौराणिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन, गोदावरीचे पाणी शिर्डीसह ठिकठिकाणच्या देवतांना नेण्याची प्रथा आहे. नदीत स्नान करणाऱ्यांची संख्याही मोठी असते. गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. त्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषित झाल्याने श्री. काळे यांनी आज सकाळीच नदीवर प्राणवायूचे सिलिंडर व सलाईन नेले. गोदावरी शुद्धीकरणाची प्रतीकात्मक मोहीम म्हणून नदीला प्राणवायू लावला, सलाईन लावले. तासभर पाण्यात प्राणवायू सुरू होता. सलाईनही सुरू होते. हे सर्व सुरू असताना काळे यांचे टाळ वाजवून भजन सुरू होते. 

गोदावरी नदीत कोपरगाव शहर व अन्य कारखान्यांचे सांडपाणी मिसळत आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालात नदीचे पाणी पिण्यास अपायकारक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी गोदावरी नदीला सलाईन लावून प्राणवायू देण्याचे अभिनव आंदोलन केले.