गाजर टोमॅटो कोशिंबीर

  • गाजर
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • मीठ
  • साखर
  • कोथिंबीर
  • दाण्याचे कूट
  • दही
१० मिनिटे
२ जण

२ लहान लाल टोमॅटो व एक लहान शेंदरी गाजर बारीक चिरा. त्यात एक चमचा दाण्याचे कूट, चिमूटभर लाल तिखट, पाव चमचा साखर, २ चमचे दही व चवीपुरते मीठ घाला. थोडी हिरवीगार कोथिंबीर चिरून घाला. सर्व मिश्रण चमच्याने एकत्रित करा. एक चविष्ट कोशिंबीर तयार होईल!

नाहीत.

स्वानुभव