मुद्राराक्षसाचे नववर्षात अर्पण (अं हं - पदार्पण)- १

  • बातमी: भारताने इंग्लंडचा नऊ गडी राखून झणझणीत पराभव केला.
  • सूचना: आमचे येथे सवंग ढोकळे आणि खणखणीत वडा पाव मिळेल.
  • बातमी: प्रसिद्ध विद्यापिठात मोठ्या उत्साहात देहसंमेलन साजरे झाले.
  • बातमी: महिलेची साडेतीन लाखाची हसवणूक
  • सूचना: सावधान! गेट हळूच उघडा. आत जत्रा आहे.
  • पाहुण्यांकडचा बटबटीत ठेचा खाऊन त्याच्या डोळ्यात पाणी आले.
  • बातमी: "दहशतवादाविरोधात निर्णायक वडा हवा. " नेता म्हणाला.
  • आयपीएस अधिकाऱ्याचे ड्रग्ज जॅकेट उद्ध्वस्त
  • अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना काश्मिरात झटक.

(दणदणीत, खमंग-झणझणीत, स्नेहसंमेलन, फसवणुक, कुत्रा, झणझणीत, लढा, रॅकेट, अटक)