सारेगम लिटिल चॅंप्स मध्ये मुलांचे बालपण हिरावून घेतले जात आहे का?

सध्या झी टीव्हीवर सारेगम लिटिल चॅंप्स नावाचा कार्यक्रम अफाट लोकप्रिय आहे. त्यातली मुले आठ दहा वर्षाची आहेत. अप्रतिम गातात. पण अवधूत गुप्ते त्याना कारण नसताना परफर्म करायला लावून त्यांचे बालपण हिरावून घेताना दिसतो.

दोन आठवड्यापूर्वी रोहित राउतला त्याने पल्लवीभोवती नाच का केला नाही म्हणून दोष दिला. पुढच्या वेळी रोहितने शर्वरी पाटणकर भोवती पिंगा घातला! पल्लवी तर त्याला किती मैत्रिणी आहेत असे सारखे चिडवत असतेच!

त्यामुळे ही मुले अवेळी मोठी होतील काय अशी भीती वाटते. काही वर्षापूर्वी फुलपाखरू किंवा सुरवंट नावाची एक विज्ञानकथा वाचली होती. त्यात एका मुलाच्या डोक्यात ज्ञान भरून त्याला मोठं करतात. तो आपल्या मैत्रिणीकडे मोठ्या माणसाच्या नजरेतून पाहू लागतो त्याची आठवण झाली!