फेब्रुवारी २००९

सोबतीचा आव आहे

भोवती अंधार आहे, रात नाही
सोबतीचा आव आहे, साथ नाही

कोणताही खेळ आता फार सोपा
मोडतो जो नियम तोही बाद नाही

ठेवले मी स्वखुषीने शस्त्र खाली
हारलो मी,पण दिली तू मात नाही

भेटण्यासाठी तुला तैयार होतो
पण तुझे फर्मान आले, साद नाही

कां असा माझ्या घराला शाप आहे?
अंगणी येतात सारे, आत नाही

सोडतांना ती म्हणाली, "वायदा तो
एक जन्माचाच होता, सात नाही"

.

(जयन्ता५२)


Post to Feed

आत, सात
सहमत
उत्तम
वा!
सहमत
खूप छान
चांगली
सुंदर
छ!
मस्त
अंगणी येतात सारे...
अहाहा
वा!!
उत्तम !
नियम आणि आत विशेष
व्वा
अप्रतिम

Typing help hide