शॉर्ट टी शर्ट घालणाऱ्या युवती!

हे संकेतस्थळ अतिशय परिणामकारकपणे काही विषयांवर चर्चा घडवून आणते हे पाहून माझ्या मनात कधी काळी आलेला एक विचार इथे व्यक्त करण्यास मी धजावत आहे.

यातून आंबट शौकीनपणा आवडणारा, बटबटीत लिखाण करणारा किंवा स्वतःला अतिबोल्ड समजणारा अशी टीका माझ्यावर होऊ नये अशी इच्छा आहे. बाकी आपला चॉइस!

हल्ली दुचाकीवरून जाणाऱ्या अनेक युवती आपला चेहरा, हात, केस झाकून घेतात. हे समजण्यासारखे आहे, कारण प्रदुषणाचा त्रास होऊ नये अथवा सौंदर्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ नये. पण हे करताना त्यातील काही 'शॉर्ट टी शर्ट' घालतात, ज्याने 'ज्या गोष्टी झाकल्या जाणे आपल्या समाजात आवश्यक समजले जाते' त्या नेमक्या झाकल्या जात नाहीत.

ही कुठली मानसिकता आहे? यातून काय स्टेटमेंट त्या मुलींना करायचे असते?

स्वतःच्या देहाच्या प्रदर्शनाबाबतीत असलेला हा दुटप्पीपणा माझ्या आकलनशक्तीच्या बाहेरचा आहे. समजा अशी एखादी मुलगी वर्गात लेक्चरला बसली, तर लेक्चरकडे मुले लक्ष देऊ शकतील का?

यावर काही प्रतिबंध असायला हवा काय? जर तसा प्रतिबंध करणे हे लोकशाहीच्या विरुद्ध असले तर नेमके काय करता येईल? मुळात हा 'मला जसा वाटतो' तसा इतर कुणाला 'वादग्रस्त मुद्दा' वाटतो काय?

धन्यवाद!