मी बोचलो म्हणाले

मी बोचलो म्हणाले

मी बोचलो म्हणाले त्यांना किती ठिकाणी
हेही खरेच, नाही माझी मिठास वाणी

अडवून त्यास धरले होते दगडविटांनी
शोधून वाट त्याची गेले निघून पाणी

 शिस्तीत राहुनी मी बेशिस्त वागणारा
 होतो उशीर तेव्हा रचतो नवी कहाणी
 इच्छा असेल तेव्हा  भेटावयास ये तू
 शोधू नको बहाणे, ठेवू नको निशाणी!

घडणार काय त्याचा आहे कुणास पत्ता?
(आत्ता मनात आहे तर घे छळून राणी )

 तारा तिच्या मनाच्या झंकारल्या कशाने?
 असते खुषीत ती अन लिहिते सुरेल गाणी

- सोनाली जोशी

(सुरेश भटांच्या 'कहाणी' या गझलेच्या जमिनीवर आधारित)