मला भविष्य दिसतं .... !

हा अनुभव मला बरेचदा आला आहे. तुमच्यापैकी काहींना आला असण्याची शक्यता आहे.

एखादेवेळी कोणी माझ्याशी बोलत असेल तर अचानक मला वाटते की आता ही व्यक्ती हे वाक्य म्हणणार आहे किंवा अशी हालचाल करणार आहे.... कधी हे मला ती गोष्ट घडण्याच्या लगेच आधी कळते तर कधी १-२ दिवसांपुर्वी तर कधी १-२ महिने किंवा काही वर्षाआधीसुद्धा. पण ते कधी स्वप्नाच्या स्वरुपात असते तर कधी जागेपणी विचारात हरवून गेलेलो असताना....

हे ६ व अवयव नाही हे नक्की कारण जी गोष्ट दिसते (किंवा मी अनुभवतो) ती पुढे केंव्हा घडेल हे मला महिती होत नाही....

मला आश्चर्यही वाटते आणि मजाही. असं तुमच्याबाबतीत कधी घडलय का? आणि असं का घडतं यावर काही स्पष्टीकरण आहे का?

आपला,

विजय