फेब्रुवारी १९ २००९

बोलणे त्याचे मनापासून ते.........

गझलेतील एक शेर बाद केला आहे व एक बदलला आहे. मार्गदर्शनाअभावी मला ते सुचले नसते. धन्यवाद!

मी म्हणालो तेच झाले शेवटी
अक्षरांचे पेच झाले शेवटी

बोलणे त्याचे मनापासून ते
तो नि ते प्यारेच झाले शेवटी

केवढे खोटे खऱ्याच्यासारखे
की खरे खोटेच झाले शेवटी

हालचाली आमच्या थंडावल्या
व्हायचे होतेच, झाले शेवटी

वाट तू बघशील वेड्यासारखा
ती म्हणे, तस्सेच झाले शेवटी

प्रेम ज्याचे नांव होते ठेवले
अंगठ्याची ठेच झाले शेवटी

वाटले राहील ते अल्लड सदा
हृदय हे कळतेच झाले शेवटी


Post to Feed

व्हायचे होतेच, झाले शेवटी
ओव्हरव्हेल्म्ड
बदल
सुंदर !
केवढे खोटे खऱ्याच्यासारखे
क्या बात है!
सुंदर
हालचाली आमच्या थंडावल्या..
सहमत

Typing help hide