परदेशातुन...

मी द. कोरियाला आलो तेंव्हाची गोष्ट. इथे आल्यावर मला इतर भारतीयांनी कोरीअन लोकांबद्दल सांगितले. ते मी माझ्या मुंबईच्या मित्राला सांगितले, तेंव्हाचा हा संवाद. हा मित्र बी. एम. सी. (बृहन्मुंबई महानगर पालिका) नामक सरकारी कंपनीत "श्वान-नियंत्रण" विभागात कार्यरत आहे.

मी :- तुला माहिती आहे, इथल्या लोकांना कुत्रे खुप आवडतात.

तोः - असं. लगेच पाठवून देतो... इथे खुप झाले आहेत.

मीः- अरे तसं नाही. म्हणजे पाळायला नाही आवडत जास्त.

तोः- मग ?

मीः- त्यांना खायला खुप आवडते. इथे "डॉग फुड" खुप महाग आहे.

तोः- अस्स? मग २-४ डझन कोरिअन पाठवून दे.... राहणे खाणे मोफत .....