संधी आणि मंदी

 मंदी आणि संधी

 यांची कधी होत नसते 'संधी'

दोन्ही एकमेकांच्या सवती

घुटमळतात दोन्ही माणसाच्या अवती भवती

मंदी असल्यास संधी दूर पळते

संधी आल्यास मंदीला पळवता येते

मंदी चुकवता येत नाही

संधी चुकली की परत येत नाही

मंदी जाता जात नाही

संधी येता येत नाही

मंदी जाण्याची वाट बघावी लागते

संधी येण्याची वाट बघावी लागते

मंदीत चुकून संधी आली तर

हे माणसा तीला आपलेसे कर

अन्यथा मंदी तीला गीळून टाकेल

आणि माणसाची सहन शक्ती पिळून टाकेल

एक मंदी पुरे आहे जगाला नाहिसे करायला

मात्र फक्त एकच योग्य संधी आवश्यक आहे, मंदीला पळवायला....

 मंदीला पळवायला...!!