रानवेड्या पाखराशी भेट झाली त्या कळीची

  रानवेड्या पाखराशी भेट झाली त्या कळीची

का हव्याशा  वाटणार्‍या आठवांना टाळले मी
फक्त  आहे तीच सोबत हेच होते मानले मी
....................................................
फोन नंबर दे म्हणाला तो मलाही शेवटी.. मग-
भेटण्याचे , लाजण्याचे..  हे... मनोरे बांधले मी

  रानवेड्या पाखराशी भेट झाली त्या कळीची
अन्  फुलाला जागण्याचे  भान आले.. .जाणले मी

............................................
आज माझ्या सोबतीची का धरावी आस त्याने  ?
जीवघेणे  पावसाळे एकटीने काढले मी

बोलतो तो एक ..करतो वेगळे काही.. तरीही
(नाटकी त्या बोलण्यावर केवढे हे भाळले मी)

आणले पैसे कसे  ही  चौकशी  तू का करावी ?
खर्च केला कोणता तू  काय केले ...काढले मी?

गप्प असणे, वाकणे ही संमती नाहीच माझी ..
 बांधलेली गाय बकरी  का कुणाला वाटले मी ?

- सोनाली जोशी