डॉक्टर्स आणि विविध टेस्टस

हल्ली डॉक्टरांकडे जाणे म्हणजे एक दिव्यच वाटावे अशी परिस्थिती आहे. याला कारण म्हणजे ते सांगत असलेल्या भरमसाठ टेस्टस.

उपाय नको पण टेस्टस आवर असे म्हणण्याचीच वेळ आहे. आणि बरेचदा"नॉर्मल रिपोर्ट" आला की पुढची दुसरी टेस्ट सांगणार... मग यांत त्यांचे डायग्नॉस्टिक स्किल्स काय उरले?

आणि आधीच तब्येतीने हवालदील झालेल्या पेशंटला सारखे सीटी स्कॅन, शुगर टेस्टस, सोनोग्राफी आणिही भलभलत्या नवीन नवीन टेस्टस ला सामोरे जावे लागते. पैशांचा तर खूपच चुराडा होतो शिवाय मनस्ताप, त्रास, काळजी. प्रत्येक ठिकाणी असह्य वेटींग टाइम, ट्रॅफिक चा जाच.....

काही मर्यादित प्रमाणात चांचण्या करणे मलाही समजू शकते पण सरसकट सर्वच रोगाच्या टेस्टस सांगणे म्हणजे डोक्टरांचे फोकस्ड निदान अपुरे पडल्याचे लक्षण नाही का?

(हा माझाच अनुभव नाही तर बऱ्याच जणांचे असे मत आहे)

आजकाल पूर्वी सारखे हुशार, अनुभवी , निष्णात डॉक्टर्स कमी झालेत का?