शक्ती

"अरे काय हे देवा? "
"काय रे काय झालं? "
"अरे सगळे चांगले गुण स्त्रीला दिलेस. "
"अरे पण तुलाही दिले नाही का? "
"सौंदर्य आणि वात्सल्य "
"सोबत जन्म देण्याचे कष्ट? "
"पण मला काय दिलेस तू? "
"तुलाही बाप होण्याचा हक्क मिळेल की"
"हुं"
"तु उगाच स्वतःला कमी समजतोय"
"पण मुलासाठी बीज देण्याव्यतिरिक्त स्त्रीला माझी काय आवश्यकता? "
"पण तुम्ही दोघांनी मिळून.... "
"हा अन्याय आहे माझ्यावर, तिला बीज नाही मिळालं तर ती आई कशी होते तेच बघतो मी"
" हा हा हा......... अरे म्हणून तर तिला सौंदर्याचं वरदान दिलय ना"
"म्हणजे माझ्यावर अन्यायच ना? "
"मग, मी काय करावं म्हणतोस? "
"तू तिच्याकडून काही गोष्टी परत घे आणि..... "
"शक्य नाही..... एकदा काही दिलं कि परत मी घेवू शकत नाही. आणि तुला देण्यासाठी माझ्याकडे आता काहीही नाही. "
"हुं.........., म्हणजे माझ्यावर अन्यायचं"
"तीला बघ. इतके कष्ट दिले, पणं तिने काहीही म्हटलं नाही. किती आनंदी आहे ती. "
"मग तु तिला आणखी बरेच काही द्यायला हवे...... नाही ? "
"आणखी काय देणार? "
"मी मागू? "
"तिच्यासाठी, तुझ्यासाठी नव्हे. "
"मान्य"
"माग"
"वर दे"
" वर? ठीक आहे.... माग काय हव ते. तथास्तु!!! "
"हुं........... आता तु तिला, तिच्याजवळ असलेल्या सर्व शक्तिंचा  विसर पडेल, हा वर दे"
"काय मागितलस रे तू ?  का? तिला छळता यावं म्हणून? "
" हो......... आता मी तीला माझी दासी बनवणार.... हा... हा.... हा......... "
"ठिक आहे. पण हे विसरू नकोस, तीला जेंव्हा तिचे गुण तू सांगिशील, तेंव्हा तिची शक्ती  दहापट होईल. "
" हा! तिला हे सांगणार कोण? मी? "
" हो.... तुच.... कधी पती बनून तर कधी बापाच्या मायेने, कधी मुलगा बनून तर कधी मित्र....... त्यावेळी तुच काय, मीही तिला अडवू शकणार नाही...... "
*****************************************************************
आज "आंतरराराष्ट्रिय महीला दिवस"!
आज तरी आपली शक्ती ओळखाल का?

(पुर्वी दुवा क्र. १  वर प्रकाशीत.)