चुंबन

प्रियेचे पहिले चुंबन
हाय मजला असे भिजुन गेले
श्रावणातही नसतील भिजले
धरणिवरील डोंगर आणि झरे

तीच्या कमनीय ओठांची
आज मजला नशा झाली
मधुशालाही पालटुन नसती आली
अशी धुंदी आज मी अनुभवली

चुंबन
तीचे घेतांना
नेत्राची भाषा मिटली
निशब्द एक शहारी
अंगाअंगात शिरशिरली

तिचे चुंबन तिचे आलिंगन
वाटले नसावे जगात आणखी काही
जीवन याहुन असावे काय सुंदर
नसावी जीवनाची हि तशी व्याख्या काही