तकाली सादम (टमेटो राइस)

  • ३ टोमॅटो
  • १० लसुण पाकळ्या
  • थोडसे आले
  • २ कांदे
  • २ वेलदोडे
  • २ वाट्या तान्दुळ
  • २ ते ३ लाल मिर्च्या
  • कोथिंबिर बारीक चिरलेली
१५ मिनिटे
४ जण
  1. कांदे, लसूण, आले यांची पेस्ट तयार करावी.
  2. टोमॅटोची सुद्धा पेस्ट तयार करावी.
  3. तांदूळ धुऊन भिजवून ठेवावेत (५ मिनिटाकरता)
  4. कुकरामध्ये नेहमीप्रमाणे मोहरीची फोडणी द्यावी.
  5. त्यात वेलदोडे आणि लाल मिरच्या घालाव्या.
  6. कांदे, लसूण, आले यांची पेस्ट घालावी.
  7. मिश्रण थोडेसे परतावे.
  8. त्यात टोमॅटोची पेस्ट घालावी... थोडे शिजू द्यावे.
  9. हवे असल्यास थोडेसे तिखट घालावे.
  10. यात तांदूळ आणि ४ वाट्या पाणी घालावे.
  11. चवीनुसार मीठ घालावे.
  12. कुकराचे झाकण लावून शिजू द्यावे.
  13. थंड झाल्यावर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून भातावर टाकावी.

हा भात तमिलनाडू मध्ये तकाली(टोमॅटो) सादम (भात) म्हणून प्रसिद्ध आहे.
या भातासोबत बटाट्याची सुकी भाजी आणि बटाट्याचे चिप्स सुद्धा छान लागतात.

सासुबाई