सांबार

  • २ वाट्या तुर डाळ
  • थोडी चिन्च
  • १० छोटे छोटे कान्दे
  • १/२ वाटीभर फरसबी बारीक चिरलेली
  • १/२ वाटी गाजर बारीक चिरलेले
  • २ ते ३ लसुण पाकळ्या,
  • १ बारीक चिरलेला कान्दा
  • कढीपत्ता,
  • सांबार मसाला
  • तिखट
  • मीठ
१५ मिनिटे
४ जण
  1. सर्वप्रथम तुरडाळ धुऊन घ्यावी.
  2. कुकरामध्ये तुरडाळ, चिरलेली फरसबी, गाजर, छोटे छोटे कांदे, दोन ते तीन चमचे सांबार मसाला, हळद, तिखट आणि मीठ घालावे.
  3. ह्यात नेहमी पेक्षा थोडे जास्त पाणी घालून शिजवावे.
  4. एका भांड्यात १/२ वाटी पाणी गरम करून चिंचेचा कोळ तयार करावा.
  5. वरण शिजले की त्यात हा चिंचेचा कोळ घालावा.
  6. एका कढईत फोडणीकरीता १ चमचाभर तेल घ्यावे.
  7. त्यात मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालावा, थोडे परतावे.
  8. तयार असलेले वरण या मिश्रणात घालावे आणि एक वाफ येउ द्यावी.
  9. हा गरम सांबार पोंगल सोबत खावा.

  1. सांबार करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. त्यापैकी ही एक.
  2. यात शेवग्याच्या शेंगा सुद्धा घालता येतात.
  3. सांबार मसाला खरंतर घरीच तयार करता येतो(पण मी अजून करून बघितला नाही). त्याची चव अजून छान लागते.

सासुबाई