पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रम -आता नेटद्वारे.

//श्री समर्थ //

चैत्र शुद्ध २, शके १९३१

सप्रेम नमस्कार,

नूतनवर्षाभिनंदन!

समर्थ भक्त श्री. द्वा. वा. केळकर यांच्या अभिनव कल्पनेतून आणि श्रीसमर्थांच्या आशीर्वादाने पत्रद्वारे दासबोध अभ्यासक्रमाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि या हजारो साधक- मुमुक्षुंनी याचा लाभ घेऊन आपली आणि पर्यायानें समाजाची अध्यात्मिक उन्नती साधण्याकडे यशस्वी वाटचाल केली आहे / करीत आहेत.

याच प्रदीर्घ आणि यशस्वी  वाटचालीतील आणखी एक पाऊल म्हणजे मुमुक्षुंना आता हा अभ्यासक्रम ( स्वाध्याय आणि भावार्थसह) sanskritdocuments.org च्या सहकार्याने  आंतरजालावरून उतरवून घेता येईल. त्यासाठी पत्ता- दुवा क्र. १ ( दासबोधाच्या खाली अभ्यासक्रमाचा दुवा आहे)

अधिकाधिक लोकांना  विशेषतः नेटिझन्स ना याचा लाभ घेता यावा म्हणून sanskritdocuments.org ने मदतीचा हात पुढे केला आणि त्यामुळेच हे शक्य झाले.

स्वाध्याय सोड्वून विपत्राद्वारे पाठवलेत तरी चालेल. मात्र तत्पूर्वी प्रवेशपत्र भरून आपला प्रवेश निश्चित करावा. पत्त्ता- दुवा क्र. २ भ्रमण ध्वनी- +९१९८८१४७६०२०

अधिक माहीती हवी असल्यास कृपया विपत्र पाठवावे अथवा व्य. नि. पाठवावा.

//जय जय रघुवीर समर्थ//