एक छानसा विनोद!

स्वीस बँकेमध्ये अनेक भारतीयांचा काळा पैसा जमा असून, हा पैसा उजेडात आणण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी

जी २० बैठकीत प्रयत्न करावेत, अशी मागणी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण आडवाणी यांनी २९ मार्च २००९

ला केली. खरंच किती उदात्त विचार आहे ना? केंद्रात भाजपची सत्ता आल्यास स्वीस बँकेतील काळा पैसा भारतात आणून, तो

जनतेच्या भल्यासाठी खर्च केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

तुम्ही म्हणाल यात काय गंमत? मी म्हणतो गंमत आहे, जरा आठवा, नसेल आठवत तर हे वाचा

http://www.loksatta.com/daily/20090101/vdh01.htm

काही महिन्या पूर्वीच भाजपच्या तिजोरीतून २ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम ‘गहाळ’ होण्याच्या धक्कादायक प्रकार घडला

होता. मात्र, भाजपने या प्रकाराची दिल्ली पोलिसांकडे फिर्याद केली नाही. सांगा का तक्रार केली नाही? उत्तर सोप्पं आहे.

पण भाजपा वाल्यांच तर्कसुत्र (लॉजिक) बघा किती पुढारतंय. "जर अशा पैशाने जर पक्ष चालवता येवू शकतो, तर मग अशा

पैशाने देशही चालवता येवू शकतो. नव्हे त्यात काय गैर आहे?"

काळा पैसा जिथं, जसा तयार होतो त्याला आळ घालण्याचं राहीलं बाजूला, अशा लोकांना दंडित करायचा विचार राहू द्या बाजूला उलट त्या 'काजळमाये'वर डोळा ठेवून तो लंपास कसा करायचा ह्या कडेच ह्यांच लक्ष.

आहे कि नाही छान विनोद? द्या टाळी!!!!