काही प्रश्न..

नमस्कार,

मनोगतावर बागडताना मला काही अडचणी आल्या आणि प्रश्न पडले ते आपल्या समोर ठेवत आहे.

१) जुनी चर्चा, साहित्य इ. वाचत असताना स्वगृही परतावे लागले आणि परत त्या चर्चेत नाही पण ते लेखन आणि इतर लेखनांची यादी असलेल्या पानावर जाण्यासाठी काय करावे?

२) मला जे लेखन वाचायचे आहे त्याचे शीर्षक मला आठवत नाही मात्र त्या पानावरच्या इतर लेखनाची शीर्षके आठवत आहेत तर मी 'शोध' द्वारे त्या पानावर (लेखनांत नव्हे) जाऊ शकतो का?

३) जुन्या लेखनावर प्रतिसाद दिल्यानंतर त्या पानावरील इतर लेखन वाचायचे असेल तर काय करावे? मी आत्ता एका जुन्या चर्चेला प्रतिसाद दिल्यानंतर मला त्या पानावरच्या इतर चर्चा वाचण्यासाठी पुन्हा पहिल्या पानापासून सुरुवात करावी लागली.

४) जुनी पाने पाहण्यासाठी सगळी पाने पहिल्यापासूनच उलटावी लागतात. ह्यावर काही उपाय आहे का?

मार्गदर्शनाच्या अपेक्षेसह....

धन्यावाद !