सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफेसी

बरेच व्यवस्थापक ( हा शब्द आवडत नसल्यास तो असा वाचा- मॅनेजर, बॉस, पी. एम.) आपल्या कर्मचारींबद्दल काही खूणगाठी (अझम्पशन) मनात ठेवतात. त्यांच्या ह्या त्या खूणगाठी काहींच्याबद्दल चांगल्या असतात तर काहिंच्याबद्दल चांगल्या नसतात.
आपण चांगल्या नसलेल्या खूणगाठी व्यवस्थापकच्या मनात का निर्माण होऊ शकतात त्या एका शक्यतेबद्दल बघू.
व्यवस्थापक (मनातला विचार): विनय हा एक फार आळशी माणूस आहे आणि त्याच्याकडून काम घ्यायचे असेल तर लक्ष द्यावे लागते
व्यवस्थापकाची प्रतिक्रिया (बिहेवियर): मी विनयला मला जे हवे आहे ते नेमकेपणे सांगतो व तो ते करतो की नाही हे पाहतो
विनयचा दृष्टीकोन: माझा बॉस माझ्यावर एखाद्या पोलिसासारखे लक्ष देतो
विनय (मनातला विचार): माझा बॉस मला माझ्या मनाप्रमाणे कधीही काम करु देत नाही
विनयची प्रतिक्रिया: मी बॉसला टाळतो आणि जर समोर आलाच तर तो सांगेपर्यंत काहीच स्वतःहून करत नाही
व्यवस्थापकाची प्रतिक्रिया: पहा! माझे बरोबर आहे की नाही?
आणि मग हे दुष्टचक्र (सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफेसी) चालूच राहते.
तात्पर्य?