बाळ्या!

प्यायले कोळून मी त्याला उगाचच
त्रास देते काव्य ते आता उगाचच 

वाट केली वाकडी, मी शांत असता
काढला काटा कुणी, माझा उगाचच!

त्यातिथे मिळवून सत्ता सोडतो मी
की जिथे म्हणतात " हा आला उगाचच"

तू इथे नाहीस हे लक्षात येते
चाळवे हृदयास हा वारा उगाचच

आपला बाळ्या म्हणे, "बाळ्या शहाणा"!
मान्य आहे ना? चला नाचा उगाचच!

भासलो नाही खरा मी एकदाही
जे नसावे ते कसे भासा उगाचच?