हाउस वाइफची तारेवरची कसरत

पूर्णतः घरी असलेल्या हाउस वाइफ – होम मेकर असलेल्या भगिनींसाठी हा चर्चेचा प्रस्ताव आहे. काम करणाऱ्या घरासाठी पैसे कमवनाऱ्या महिलांना थोडे तरी घरात महत्त्व असते. पण तसेच महत्त्व हाउस वाइफला नसते.

हाउस वाइफला काय वाटते –
1. लग्नाआधी जॉब केलेला असतो. स्वतः: उच्चशिक्षित असूनही लग्नानंतर जॉब करता येत नाही.
     कारण –
     1. नवऱ्याची मिळकत खूप चांगली असते. त्यामुळे घरातून जॉब करायला परवानगी नाही.
     2. लग्न करून H4 dependent visa घेऊन नवऱ्यामागे अमेरिकेत आलेल्या हाउस वाइफ ज्यांना अमेरिकेत काम करण्याची   परवानगी नाही.
2. आपण काम करू शकत नाही पैसे कमावू शकत नाही. आर्थिक द्रुष्ट्या नवऱ्यावर अवलंबून असल्याची मनात बोचणी.
3. स्वतःसाठी काही वस्तू घ्यायची असेल तर 10 वेळा विचार करवा लागतो.
4. काही शिकावे, कोर्सकरावा तर घरातून परवानगी नाही. घरातल्या  जबाबदाऱ्या पाडण्यासाठी सतत घरी राहावे लागते.

अशा प्रसंगी 24 तास घरी राहून हाउस वाइफला खूप साऱ्या मानसिक तणावातून जावे लागते. त्यासाठी हि चर्चा.

बायकोने घरी राहून सासू सासऱ्यांची, मुलांची, नवऱ्याची, आणि घराची काळजी घ्यावी. नातेवाईकांचा, येनाऱ्या जाणाऱ्यांचा पाहुणचार करावा. घरी सासू असेल तर विचारायलाच नको. सारख्या सूचना. घरात सुनेने काय स्वयंपाक करायचा? कसा करायचा? याच्या सूचना सासूने द्यायच्या. सासूला वाटते – मी वयाने मोठी आहे. घरातले निर्णय मी घेणार. सुनेकडून अपेक्षा - सुनेने प्रत्येक गोष्ट विचारून केली पाहिजे. थोडक्यात घरातली सत्ता सासू सतत हातात ठेवते. आणि सुनेला सतत दाबून ठेवते. नवऱ्याची बायकोकडून अपेक्षा – माझ्या आईला दुखवू नये. सगळं गुपचुप सहन करावे. जास्त बोलू नये. या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करता करता बिचाऱ्या हाउस वाइफला काही अपेक्षाच राहत नाही.

हाउसवाईफ होममेकर होणे हे खरंतर तारेवरची कसरत आहे.

आपल्याला काय वाटते -
1. हाउसवाइफ म्हणून जबाबदारी पार पाडताना स्त्रीला कोणते मानसिक त्रास सहन करावे लागतात?
2. हाउसवाइफ म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडण्यासाठी स्त्रीने काय करावे?